Ad will apear here
Next
आनंदाचा वारसा पुढे नेणारी अनोखी मैफल ‘आनंदयात्री’


मुंबई : लेखक, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या पु. ल. देशपांडे (पुलं) यांनी आपल्या विविध कलांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही ‘पुलं’ नावाची जादू प्रेक्षकांना भुरळ घालते. त्यांच्या याच समृद्ध कलेचा ठेवा ‘स्टार प्रवाह’ प्रस्तुत ‘आनंदयात्री’ कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडण्यात येणार आहे. शब्द-सुरांची ही अनोखी मैफल १७ मार्चला दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

या खास कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी, जयदीप वैद्य, नचिकेत लेले, सावनी दातार-कुलकर्णी, चंद्रकांत काळे, मधुरा दातार आणि मुग्धा वैशंपायन या सुप्रसिद्ध गायकांनी ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी सादर करत रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अभिनेते संजय मोने, आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री यांनी ‘पुलं’च्या साहित्यातील अजरामर पात्रे पुन्हा एकदा रंगमंचावर जिवंत केली. ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेल्या ‘वायदा केला’ या गाण्यावर अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनिसने ठेका धरत आनंदयात्रीची मैफल संस्मरणीय केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी केले आहे.

या अनोख्या सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी ‘पुलं’च्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आनंदयात्री हा फक्त कार्यक्रम नसून ती एक परंपरा आहे. हीच परंपरा अखंड जोपासण्याचा ‘स्टार प्रवाह’चा प्रयत्न आहे. ‘आनंदयात्री’च्या या प्रवासात अनेक दिग्गजांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकारांना यानिमित्ताने मानवंदना देण्यात येईल. शब्द-सुरांची ही अनोखी मैफल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि घरात जागा बनवेल याची आम्हाला खात्री आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZQIBY
Similar Posts
‘नवागतांना ‘पुलं’नी नेहमीच मदतीचा हात दिला’ पुणे : ‘आपल्यातील कलागुण रसिकांसमोर सादर करून त्यांना त्याचा आनंद घेऊ द्यावा, अशी ‘पुलं’ची धारणा होती. विविध क्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या ‘पुलं’नी परफॉर्मर म्हणूनही आपली कामगिरी उत्तमपणे बजावली. कला क्षेत्रातील नवागतांना नेहमीच मदतीचा हात दिला,’ अशी भावना साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली
‘पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणे आव्हानच’ पुणे : ‘पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या पारदर्शक, नितळ माणसाची भूमिका करणं हे आव्हानच आहे. तो नितळपणा चेहऱ्यावर आणताना मला खूप कष्ट पडले. आता पु. ल. सारखी माणसे नाहीतच. त्यांचं अक्षर अन अक्षर वाचलेले असूनदेखील त्यांची भूमिका साकारणं अवघड होतं’, अशी भावना अभिनेते संजय मोने यांनी व्यक्त केली. सोनी सब वाहिनीवर
मुंबईत रंगणार ‘पुष्कर शो थ्री’ नाट्यमहोत्सव मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक यशस्वी कारकीर्द असणारे अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचा येत्या ३० एप्रिलला ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्या निमित्ताने, ‘पुष्कर शो थ्री’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये पुष्कर श्रोत्री यांच्या सध्या सुरू असलेल्या ‘आम्ही आणि आमचे बाप’,
‘जिवाभावाचे मित्र ही खूप मोठी शक्ती’ प्रचंड वाचन, सडेतोड स्वभाव आणि संवेदनशीलता यांसाठी प्रसिद्ध असलेले संजय मोने आपल्या उत्तम अभिनयामुळे गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणावर निस्सीम प्रेम करणारे संजय मोने सध्या एका हिंदी वाहिनीवरील मालिकेत ‘पुलं’ची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या जीवनातील सकारात्मकतेचा वेध घेणारी ही मुलाखत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language